Saturday, November 16, 2013

Talmal Complete Story


तळमळ 

शाळेचा आज पहिला दिवस होता. सुधीर आणि त्याचा लहान भाउ महेश दोघेही शाळेची तयारी करत होते. आईने जेवणाचा डबा भरून दिला होता. सुधीरला अस्वस्थ वाटत होते कारण तो पुन्हा त्याच वर्गात बसणार होता त्याचे सर्व मित्र उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेले होते पण सुधीर नापास झाल्यामुळे पुन्हा त्याच नवव्या इयत्तेत राहिला होता आणि मुख्य म्हणजे त्याचा लहान भाउ महेशही आता त्याच्याच वर्गात शिकणार होता.  

"दादा काय झाले आज अस्वस्थ वाटतो आहेस?", महेशने विचारले. 
"काही नाही रे जरा डोक दुखतय, बाकी काही नाही. तू आवर लवकर शाळेला उशीर होतोय. आज पहिला दिवस आहे, वेळेवर शाळेत गेले पाहिजे." 

पटापट तयारी करून दोघेही शाळेला निघाले. घरातून शाळेत पोहाचेपर्यंत सुधीर महेशशी एकही शब्द बोलला नाही. महेशलही काही विचारावेसे वाटले नाही. दोघेही शाळेत पोहोचले आणि वर्गात येऊन बसले, सुधीरचा हा जुनाच वर्ग होता फक्त सर्व मूल मुली नवे होते. सुधीरणे त्याची भिरभिरती नजर पूर्ण वर्गभर फिरवली. सर्व मुलांच्या चेहर्यावर उत्सुकता आणि उत्साह दिसत होता. सुधीरला मात्रा कशात रस वाटत नव्हता.  
"महेश तू इथे पहिल्या किव्वा दुसर्या बकाड्यावर बैस, मी मागे बसेन." 
महेश काही बोलणार इतक्यात सुधीर मागील बाकद्यांकडे वळला आणि शेवटच्या बाकाड्यावर जाउन बसला. 
तास चालू होण्यास अजुन वेळ होता. सुधीरणे सभोवार नजर फिरवली, मुलांचा गडबड गोंधळ चालू होता, काही मुले गप्पा मारीत तर काही नवीन ओळखी करून घेत होती. मागील इयत्तेतिल दोन तीन मूल त्याच्या नजरेस पडली पण काही प्रतिसाद न देता तो गप्प बसून राहिला.  
काही वेळाने शाळा भराल्याची घंटा वाजली, वर्गशिक्षक वर्गात आले. प्रार्थना झाल्यानंतर वर्ग शिक्षकांनी आपली ओळख मुलांना करून दिली तसेच मुलांचीही ओळख करून घेऊ लागले. एक एक विद्यार्थी आपली ओळख करून देऊ लागला, सुधीरची पाळी आल्यावर सुधीर उभा राहिला तेव्हा वर्ग शिक्षक म्हणाले " काय सुधीर राव तुमची ओळख करून देण्याची गरज नाही, बर का मुल्लांनो हे तुमचे सिनियर, गेल्या वर्षापासून याच वर्गात आहेत..."  
मास्तर बोलत होते, सुधीरला एक एक शब्द काट्या सारखा टोचु लागला. त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. डोक्यात मुंग्या शिरू लागल्याचा भास होऊ लागला, डोक थरथरू लागल, हातापायाला कंप सुटला. उभ्या जागीच पडतोय की काय असा भास होऊ लागला. नामुष्कीणे सुधीर खाली मान घालून उभा होता. शेवटी एकदाच मास्टरांनी त्याला बसण्यास सांगितले आणि तो खाली बसला. दिवसभर शाळेत त्याचे लक्ष लागले नाही. 
संध्याकाळी शाळा सुटल्यावर सुधीर आणि महेश घरी आले. जेवण खान आटोपून सुधीर बाहेर खोलीत येऊन बसला. शाळेतून आल्यापासून सुधीर फारस काही बोलला नव्हता आपली अस्वस्थता तो आपल्याकडेच ठेऊन गप्प बसला होता. 
"सुधीर, असा गप गप का बसला आहेस?", सुधीरच्या वडिलांनी विचारले. 
"काही नाही बाबा जरा डोक दुखतय" 
डोक दुखतय हे ऐकून सुधीरच्या वडिलांच्या पोटात गोळा आला. घाबरून त्यांनी विचारले "काय डोक दुखतय, मग डॉक्टरांकडे जायाच का?" 
"नाही नाही बाबा तस फारस नाही दुखत, तुम्ही काळजी करू नका." 
सुधीरच्या वडिलांची अस्वस्थता वाढली, कारण सुधीरच हे दुखन काही सामान्य नव्हत. गेल्या काही महिन्यांपासून सुधीरला हा त्रास चालू झाला होता. साधारण सहा सात महिन्यांपुर्वीची गोष्ट असेल, त्या रात्री सुधीर खेळून झाल्यानंतर उशिरा घरी आला. जेवण झाल्यानंतर सर्व झोपले होते. सुधीरही बिछान्यावर आडवा झाला. काही वेळ पडून राहिल्यानंतर सुधीरला अस्वस्थ वाटू लागले पण तो तसाच पडून राहिला. हळू हळू त्याला जाणवू लागले की आपला श्वास अडखळत आहे, हात पायाला मुंग्या येत आहेत आणि अचानक त्याचे हृदय जोरात धडधडले. डोक बधिर झाल. उरावर बसून कोणी छाती बडवतय की काय..., पाण्यामाधे गटांगळ्या खाल्ल्या सारखे त्याला वाटू लागले तसा तो जोरात ओरडला. सर्वजण घाबरून झोपेतून जागे झाले. काय झाल म्हणून विचारू लागले. सुधीरला काही सुचत नव्हते तो उठला आणि बातरूम मधे गेला हाता पायावर आणि तोंडावर पाणी मारल्यावर त्याला जरा बरे वाटले. 
दुसर्‍या दिवशी सकाळीच सुधीरला घेऊन त्याचे वडील डॉक्टरांकडे गेले. काल रात्री काय काय घडले ते सर्व सुधीरणे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी काही चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला. दोन दिवसात सर्व चाचण्या करून सर्व रिपोर्ट डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट काळजीपूर्वक अभ्यासले पण कशातही दोष आढळला नाही. त्यांनी सर्व रिपोर्ट सामान्य असल्याचे सांगितले आणि सुधीरच्या वडिलांचा जीव भांड्यात पडला. 
काही दिवस ठीक गेले आणि एका रात्री... 
सुधीर रात्री शांत झोपला होता पण मध्यरात्री त्याला अचानक जग आली. कसल्यातरी अनामिक भीतीची त्याला चाहूल लागली. मुंग्या आता पायाच्या तळव्यावर आहेत. हळू हळू त्या वर चढतायत. हृदय आता स्वस्थ आहे पण काही क्षणातच ते गटांगळ्या खाईल, जोरजोरात धडधडेल आणि छातीत जोरात हादरा बसला. श्वास गुदमरत आहे, मुंग्या आता डोक्यात जातील, आणि डोक भुन्ग्यासारख घन घनु लागला. मला वेड लागत आहे का? मी वेडा होत आहे का? "हे काय होतय? मी वेडा होईन..." जिवाच्या आकांताने सुधीर ओरडला.  

दिवसेंदिवस सुधीरचा त्रास वाढु लागला. सर्व प्रकारच्या शारीरिक चाचण्या करून झाल्या पण कशातही दोष आढळत नव्हता. सुधीरच्या आई वडिलांची चिंता वाढु लागली. महिनाभर सुधीर शाळेतही गेला नाही. त्याच खानपिनहि कमी होऊ लागल. प्रकृती खालवत चालली. त्याची आई रोज रडत बसे. वडिलांचे कामात लक्ष लागत नसे. सर्व उपाय करून झाले होते, डॉक्टर तांत्रीक मान्त्रिक पण काही उपाय होत नव्हता. रात्र झाली की सुधीरची तळमळ वाढत असे. आजची रात्र कशी जाईल याची भीती त्याला रोज असायची. मित्रांबरोबर खेळायालाही सुधीर जायचा नाही. मित्र त्याला बोलावत असत पण सुधीर त्यांना काहीतरी कारणं सांगून टाळाटाळ करायचा. 
एकदा सुधीर दुकानात गेला. काही समान घेऊन तो घरी परतत होता आणि अचानक वाटेत तो अडखळला, घाबरून तो हळू हळू चालू लागला पण त्याला जाणवू लागले की आपल्याला सरळ चालता येत नाही आहे. काहीतरी पायात घुटामळतय. त्याला दरदरुण घाम येऊ लागला. घर तर काही अंतरावरच होते. कसबस स्वतःला सावरत सुधीर घरी आला. घरी आल्यावर तो एकटाच आपल्या खोलीत जाउन रडत बसला. त्याने त्याबद्दल कोणालाच काही सांगितले नाही. 
काही दिवसांनी सुधीर शाळेत जाउ लागला पण शाळेत त्याचे लक्ष लागत नसे. कधी कधी अर्ध्या दिवसातच शाळेतून घरी यायचा आणि खाडेही आधून मधून होऊ लागले. कशेबशे वार्षिक परीक्षे पर्यंत सुधीरने दिवस काढले. परीक्षा दिली पण शेवटी तो नापासच झाला. त्याला प्रचंड मनस्ताप होऊ लागला. सुधीर अधिकच हतबल झाला पण त्याच्या आई वडिलांनी त्याला धीर दिला. त्याच्यावर कसलीच बंधने टाकली नाहीत कारण त्यांना फक्त सुधीर ठीक हवा होता. 
'हा एक विळखा आहे. तुझ शरीर आणि मन आता माझ्या ताब्यात आहे. हा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत जाणार आहे. तुझ या जगात आता काहीच काम उरल नाही. तू फक्त एक बाहुला आहेस ज्याच्यावर माझ नियंत्रण आहे. तुला घरापासून दूर जायचे आहे, दूर जायाच आहे...' भयंकर किंचळत सुधीर झोपेतून जागा झाला, "आई मला वाचव...". 
दुसर्या दिवशी सुधीर आणि महेश शाळेतून घरी आले. काही वेळ सुधीर घरी बसला. त्याचे वडील कामावरून घरी आले. सर्वजण एकत्र चहा घेत बसले. "आई बाबा मला आता बर वाटताय, मला आता कसालाच त्रास होत नाही.", सुधीर. 
"तू बरा तर आम्ही बर बाळा, पण तुला कसलाही त्रास झाला तर आम्हाला सांगत जा.", सुधिरचे वडील बोलले. 
"नाही बाबा आता कसालाच त्रास नाही, काल पासून अगदी छान वाटतय." 
"बर झाल बाळा, पण काळजी घेत जा, बाहेरच काही खात जाउ नकोस, जास्त वेळ बाहेर नाही जायच. बर का.", सुधीरची आई बोलली. 
"हो आई. ठीक आहे. पण मी थोडावेळ मित्रांकडे जाउन येतो बरेच दिवस त्यांना भेटलो नाही." 
'ठीक आहे पण लवकर ये घरी." 
सुधीर उठला त्याने तयारी केली. दाराजवळ आला आणि म्हणाला, "आई बाबा, येतो मी." 
सुधीर घरातून बाहेर पडला. रस्त्यावर आला, त्याला जाणवू लागले काहीतरी पायात घूटमळतय. सुधीर चालत होता. त्याच्या नकळत तो फक्त चालत होता. तो कुठे जात आहे(कुठे ओढला जात आहे) त्याला काहीच काळात नव्हत, तो फक्त त्याचे पाय न्हेतील तिथे जात होता. 
"बराच वेळ झाला, सुधीर अजुन आला नाही घरी.", सुधीरच्या आईने त्याच्या वडिलांना काळजीने विचारले. 
"येईल ग, मित्रांबरोबर खेळत असेल, येईल इतक्यात. काळजी नको करू." 
"महेश बाळा जरा तू दादाच्या मित्रांकडे जाउन बघून ये सुधीर आहे का तिकडे." सुधीरच्या आईने महेश ला सांगितले. 
महेश सुधीरला बघण्यासाठी त्याच्या सर्व मित्रांकडे जाउन आला, पण सुधीर कुठेच नव्हता. तो घरी आला सुधीर कुठेच भेटला नसल्याचे त्याने सांगितले तसेच तो कोणत्याच मिट्राकडे गेला सुधा नाही हे सांगितल्यावर त्याच्या आई वडिलांची पाचावर धरण बसली. रात्रीचे दहा वाजून गेले होते सुधीरला घरातून जाउन बराच वेळ झाला होता. त्याच्या वडील स्वतः बाहेर पडले काही शेजर्यंच्या मदतीने त्यांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पण सुधीरचा काहीच पत्ता लागला नाही. 
रात्रीचे बारा वाजले होते. आजूबाजूला भयंकर शांतता होती. अमावस्येची रात्र होती, रात्रीच्या काळोखात सुधीर बुडाला होता. पाय अडखळत होते. हृदयाची धडधड वाढत होती. सुधीर कुठे आला होता कशाला आला होता त्याचे त्यालाच काही सुचत नव्हते. एकाजागी सुधीर थांबला, घूटमळ वाढत चालली होती. त्याने त्याचे शरीर आडवे केले, मानेला थंडगार स्पर्श झाला. सुधीर वाट बघत होता ट्रेन येण्याची. 
दुसर्‍या दिवशी सुधीर च्या घरचा फोन वाजला. 
"हॅलो, मिस्टर गजानन मोहीले बोलताय?" 
"हो मीच." 
"तुम्हाला रेल्वे पोलिस स्टेशनला याव लागेल." 
"काय झाल? साहेब", सुधीर च्या वडिलांचे अवसानच गळाले. 
"एका मुलाची बॉडी इथे आली आहे, काल रात्री अपघातात त्याला मरण आले, तुम्ही येऊन ओळख पटवून..." 
त्यांच्या हातातून फोन खाली पडला. 
"काय झाल, काय झाल तुम्ही बोलत का नाही..." 
"आपला सुधीर गेला... आपल्याला सोडून... कायमचा" 
सुधीरच्या घरी आक्रोश होत होता. सुधिरचि आई उर फुटेस्तॉवर रडत होती. सुधिरचे वडील कसेबसे स्वतःला सावरत त्याच्या आईचे सँत्वान करीत होते. माणसांची गर्दी जमा होत होती. सुधिरचे शव अजुन आणले नव्हते. काही वेळातच सुधीर चे शाव आणले. त्या शवाकडे पाहून सुधीरच्या वडिलांचा ही बांध फुटला आणि ते धाय मोक्लुन रडू लागले. 
महेश आतील रूमच्या एका कोपर्‍यात गुडघ्यात डोके खूपसून रडत बसला होता. बाहेर येण्याचा त्याला धीर होत नव्हता. छाती जोरजोरात धडधडत होती, हाता पायाला मुंग्या येऊ लागल्या होत्या.डोक सुन्न पडल होत, एकच आवाज घुमत होता… 'तुला सुद्धा नाही सोडणार.